Loading...

शिला दीक्षित यांचं जाणं उद्ध्वस्त करणारं; राहुल गांधींना शोक अनावर

दिल्ली | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शिला दीक्षित यांचं निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यावरच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

शिला दीक्षित यांच्या जाण्याने मी उध्वस्त झालो आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पोरकी झाली आहे. त्या दिल्लीकरांच्या आजी आणि काँग्रेस पक्षातच्या प्रिय कन्या होत्या, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

Loading...

माझे आणि शिलाजी यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. माझ्या अडचणीच्या काळात त्यांनी मला खूप मदत केली. पक्षाला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेले होते. त्यांचं काम आमच्या सगळ्यांच्या नेहमीच स्मरणात राहिल, अशा भावना राहुल यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विविध मान्यवरांनी ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आदरांजली अर्पण केली आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-युतीचं राज्य आल्यास मुख्यमंत्री???; आदित्य ठाकरे म्हणतात…

Loading...

-दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचं निधन

-धक्कादायक! व्यायामासाठी रस्त्यावर आलेल्या तीन मुलांना वाहनानं चिरडलं

-…म्हणून मी आणि प्रीतम मुंडे संसदेत हसलो- रक्षा खडसे

-नारायण राणे कोणत्या मतदारसंघातून विधानसभा लढवणार?; नितेश राणे म्हणतात…

Loading...