बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता, पण…”

नवी दिल्ली | देशाच्या राजकारणातील पडद्यामागचा महत्त्वाचा चेहरा म्हणून प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांना ओळखण्यात येतं. प्रशांत किशोर यांनी देशातील बहुतांश मोठ्या पक्षांसोबत निवडणुकीत काम केलं आहे. सध्या देशात 2024 साली देशाचा पंतप्रधान कोण होणार ही चर्चा रंगली आहे. अशावेळी प्रशांत किशोर यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

प्रशांत किशोर यांनी सध्या देशात चालू असणाऱ्या विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशभर दौरा करत असल्या तरी भाजप विरोधात लढण्यासाठी त्यांना काॅंग्रेसशिवाय पर्याय नाही. राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे. पण त्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करणं फार महत्त्वाचं असल्याचं स्पष्ट मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ज्या राजकीय उंचीवर आहेत ते त्यांच्या कामामुळं आहेत. परिणामी काॅंग्रेसला सक्षम विरोधी पक्ष बनावं लागेल जेणेकरून भाजपला पराभूत करता येईल, असंही किशोर म्हणाले आहेत. केवळ राजकीय पक्षांच्या ताकदीच्या जोरावर भाजपला पराभूत करणं अशक्य आहे. काॅंग्रेसला विरोधी पक्षांची मोट बांधून काम करावे लागेल.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी राज्याच्या दौऱ्यावर असताना युपीए सध्या अस्तित्वात नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर टीएमसी आणि काॅंग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली होती. भाजपचा सामना करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सध्या सर्वत्र बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या 

ओमिक्राॅनबाबत तज्ज्ञांचा गंभीर इशारा; ‘या’ महिन्यात रूग्ण झपाट्याने वाढणार

ठोंबरेंच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवार म्हणतात, ‘रुपालीताई डॅशिंग नेत्या, मात्र…’

विरूष्काला मोठा धक्का! विराट कोहलीपाठोपाठ आता अनुष्कालाही डच्चू

करण जोहरच्या पार्टीत ठाकरे सरकारचे मंत्री?; अशिष शेलार म्हणतात, ‘CCTV फुटेज तपासा’

गुगलचा कर्मचाऱ्यांना झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More