बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी नरेंद्र मोदी नसून फसवणार नाही, मी तुम्हाला…’; राहुल गांधींनी दिली ही पाच आश्वासनं

नवी दिल्ली | आसाममध्येही निवणुकीचे वारे वाहायला सुरूवात झाली आहे. काँग्रेस आणि भाजप आपली पुर्ण ताकद लावताना दिसत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस पक्षातीले नेते टीका करत आहेत. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना आसामच्या जनतेला काही आश्वासनं दिली आहेत.

भाजपने आसामच्या चहाच्या मळ्यातल्या मजुरांना 351 रुपये रोज देण्याचं आश्वासन दिलं. पण दिले किती तर अवघे 167 रुपयेच. मी नरेंद्र मोदी नाही मी फसवणार नाही. आज मी तुम्हाला 5 गोष्टींची खात्री देतो. चहाच्या मळ्यातल्या मजुरांसाठी 365 रुपयांचा दर, सीएएला विरोध, राज्यात 5 लाख रोजगाराच्या संधी, 200 युनिटपर्यंत मोफत वीज आणि प्रत्येक गृहिणीसाठी 2000 रुपये,  असं राहुल गांधी म्हटलं आहे.

देशात लोकशाहीचं पतन होत आहे. तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी आंदोलन करत असून सीएए सुद्धा आहे. आसामची जनता दिल्लीत आल्यानंतर त्यांनी त्यांची संस्कृती, भाषा बदलावी, अशी आपण अपेक्षा ठेऊ शकत नसल्याचं राहुल गांधी यांनी म्हणाले.  दिब्रुगढमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपसह आरएसएसवरही निशाणा साधला.

दरम्यान, नागपूरमध्ये जन्म झालेली एक संघटना आख्ख्या देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्यपालांकडे तक्रार केल्यानंतर पंकजा मुंडेनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनावरील लसीचा ‘DNA’ वर परिणाम होतो का? आरोग्यमंत्री म्हणाले…

आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडही पाहायचं नाही- ममता बॅनर्जी

महाराष्ट्र सरकारकडुन कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी; ‘हे’ आहेत नवे नियम!

‘कार ॲंड बाईक’चे 2021 चे पुरस्कार जाहीर, पाहा कोणत्या गाड्यांनी मारलीय बाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More