देश

भाजपमुळे देशाची अर्थव्यवस्था आयसीयुमध्ये- राहुल गांधी

नवी दिल्ली | देशाची अर्थव्यवस्था आयसीयुमध्ये गेली आहे. सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. भाजपने सुरु केलेली तानाशाही चालणार नाही, असं म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

काँग्रेसचं आज दिल्लीत ‘भारत बचाओ’ आंदोलन आहे. ढासळती अर्थव्यवस्था आणि इतर मुद्द्यांवर रामलीला मैदानावर देशभरातले काँग्रेस कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी सभेला संबोधित करणार आहेत.

भाजप सरकार देशाला मागे नेत आहे. लोकांसमोर सत्य आलं पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत पोहोचली आहे, अशी टीका राहुल यांनी केली आहे. आज रामलीला मैदानावर होणाऱ्या सभेला संबोधित करणार असल्याचं राहुल गांधींनी ट्विट करुन सांगितलं आहे.

दरम्यान, देशाचा जीडीपी सातत्याने खालावत आहे. या मुद्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. आंदोलन करुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या