देश

संघाचा देशातील सर्व यंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचा डाव- राहुल गांधी

भुवनेश्वर | देशातील सर्व संस्था, यंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते सध्या ओडिशा दौऱ्यावर आहे यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

शिक्षण, न्यायव्यवस्था अशा प्रत्येक यंत्रणेत संघाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे देशात अराजकतेची स्थिती आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

एकाच विचारसरणीच्या लोकांच्या हाती सत्ता असणं धोक्याचं आहे. काँग्रेस विकेंद्रीकरण, यंत्रणाचे स्वातंत्र्य यावर विश्वास ठेवणारा पक्ष असल्याचं राहुल यांनी म्हटलं.

दरम्यान, भाजप सरकार ईशान्येकडील राज्यांमध्ये धर्म आणि वंशाच्या आधारावर ध्रुवीकरण करु पाहत आहे, असंही त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

-वीर सावकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी; संजय राऊतांची प्रतिक्रिया

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची शाळांवर सक्ती

-नाणेफेक जिंकत भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

-युतीसाठी नरेंद्र मोदींची डिनर डिप्लोमसी! उद्धव ठाकरेंना दिलं भोजनाचं निमंत्रण

-बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘पद्मविभूषण’ जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या