नवी दिल्ली | काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी वेळोवेळी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना दिसतात. आसामच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे आरएसएसवर टीका केली होती. अशातच पुन्हा एकदा राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून आरएसएसवर निशाणा साधला आहे.
मला असं वाटतं की, आरएसएस आणि त्यांच्या संबंधीत संघटनेला संघ परिवार म्हणणं योग्य ठरणार नाही. परिवारामध्ये महिला असतात, वडिलधाऱ्यांसाठी सन्मान असतो. परिवारात करूणा आणि स्नेहाची भावना असते, जी आरएसएस मध्ये दिसत नाही. आजपासून मी आरएसएसला संघ परिवार म्हणणार नाही, राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
याआधी देखील राहुल गांधी यांनी आरएसएसच्या शाळेवरून संघावर टीका केली होती. पाकिस्तानातील कट्टरपंथी इस्लामवादी मदरशांचा वापर करतात तसाच वापर संघ भारतात करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. तर संघांच्या शाळांना पैसा कुठून येतो, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, नागपुरात जन्म घेतलेली एक संघटना संपुर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी आरएसएसवर टीका केली होती. सध्या आसाम आणि केरळच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी जोर लावत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेत भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.
पाहा ट्विट-
मेरा मानना है कि RSS व सम्बंधित संगठन को संघ परिवार कहना सही नहीं- परिवार में महिलाएँ होती हैं, बुजुर्गों के लिए सम्मान होता, करुणा और स्नेह की भावना होती है- जो RSS में नहीं है।
अब RSS को संघ परिवार नहीं कहूँगा!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 25, 2021
थोडक्यात बातम्या-
ट्रायडंट हॉटेलमध्ये 100 दिवसांचं बुकिंग; सचिन वाझे प्रकरणात एनआयएचा मोठा खुलासा
देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण…- संजय राऊत
संतापलेल्या हत्तीचा फोटो काढणं बेतलं असतं जिवावर, पाहा व्हिडिओ
‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 20 पैशांत धावेल एक किलोमीटरपर्यंत; जाणून घ्या किंमत
सुप्रिया सुळे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Comments are closed.