“पूर्वीसारखाच भारत निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”
नवी दिल्ली | पूर्वीसारखाच भारत निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीच आमचा संघर्ष सुरू आहे. भाजप लोकांचा आवाज दाबत आहे. तर आम्ही लोकांचा आवाज ऐकण्याचं काम करत आहोत, असं काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणालेत.
राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठातील आयडियाज फॉर इंडिया संमेलनात भाग घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर तसेच जोरदार हल्ला चढवला.
भाजपने चारही बाजूने रॉकेल ओतून ठेवलं आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. भाजप आणि संघ भारताला एक भूगोल म्हणून पाहत असल्याची टीकाही त्यांनी केलीये.
दरम्यान, चीनच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या आयडियाज फॉर संमेलनात सीताराम येचुरी, सलमान खुर्शीद, तेजस्वी यादव, महुआ मोईत्रा आणि मनोज झा आदी विरोधी पक्षाचे नेतेही सहभागी झाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ
कंगनाच्या ‘धाकड’पेक्षा कार्तिकचा ‘भूल भुलैया 2’ सरस, पहिल्या दिवसाची कमाई आली समोर
‘काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे, ही भोकं शिवणार कशी?’; शिवसेनेचा प्रहार
सर्वसामान्यांना धक्क्यावर धक्के! सीएनजी पुन्हा महागलं
IANS-C Voter Survey| पंतप्रधान म्हणून आजही मोदींनाच पंसती, राहुल गांधी मात्र…
Comments are closed.