Top News

शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला आहे- राहुल गांधी

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या पाच नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच कृषी कायदे हे देशातल्या शेतकऱ्यांचं हित साधणारेच आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. असं असेल तर मग आज शेतकरी रस्त्यावर का आहेत?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

आपल्या देशातला शेतकरी हा देशाच्या जडणघडणीतला एक जबाबदार घटक आहे. तो मागे हटणार नाही आणि घाबरणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना नवा प्रस्ताव देण्यात आला. पण शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा हा कायदा दुरुस्ती प्रस्ताव फेटाळला आहे.

थो़डक्यात बातम्या-

मोदी सरकारचा ‘तो’ प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; शेतकरी मागणीवर ठाम

पुढील सुनावणीपर्यंत मराठा तरुणांचं काय?; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला सवाल

शेतकऱ्यांसाठी फ्री डिझेल; ‘या’ महामार्गावर सुरु आहे खास पुरवठा!

“देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करा”

‘शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात’; दावनेंचा अजब दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या