बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा लवकरच करतील”

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. त्यातच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केला आहे. यामुळे कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे.

म्युकरमायकोसिस या आजारावर उपाय करण्यासाठी देशपातळीवर संशोधन सुरू आहे. मात्र या आजारावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. कोरोनानंतर उद्भवत असलेल्या ब्लॅक फंगस रोगावरील उपचारासाठी लवकरच टाळ्या अन् थाळ्या वाजवायची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील, असा टोला राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रंटलाईन वर्कर्सच्या कामाचं कौतुक करण्यासाठी नागरिकांना टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचं आवाहन केलं होत. त्यावेळी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवल्या होत्या. त्यावरुनच राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलंय.

दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता ब्लॅक फंगसच्या नवीन आजाराचा सामना आपल्याला करायचा आहे. या नव्या स्ट्रेनला निपटण्यासाठी सावधानी आणि योग्य ती व्यवस्था करण्यासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतील फ्रंटलाईन वर्कर्सशी बोलताना सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

प्रसिद्ध जेष्ठ संगीतकार विजय पाटील यांचं निधन!

‘कोरोना लसींमुळेच…’; नोबेल पुरस्कार विजेत्या साथरोग तज्ज्ञाचा खळबळजनक दावा

पुणे हादरलं! शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडून 15 वर्षीय मुलीवर बलात्कार

‘2 महिन्याच्या बाळाला आईचं दूध हवंय’; भूमी पेडणेकरने केली ब्रेस्ट मिल्कची मागणी

स्टीलच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More