बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही- राहुल गांधी

नवी दिल्ली | काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी वारंवार केंद्र सरकारवर टीका करताना दिसतात. लॉकडाऊन, लसीकरण यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आज पुन्हा राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

देशात कोरोनाचं संकट वाढलेलं असतानाही नरेंद्र मोदी सरकारकडून अजूनही कर वसुली केली जात आहे. त्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबताना दिसत नाही, असा संताप राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

लोकांचे जीव जातायत पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलं होतं.  देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात असल्याचं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना सल्ला दिला आहे. तसेच सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती देखील राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली आहे.

दरम्यान, कालच कोरोना संकट रोखताना सिस्टिम फेल झालेली नाही. तर मोदी सरकार फेल झालं आहे, असं म्हणत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. मोदी सरकारने लोकांना मदत करण्याऐवजी आपल्या संवैधानिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. या वर्षाच्या सुरुवातीलाच अहंकाराने भरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची लढाई जिंकल्याचा दावा केला. त्यांच्या पक्षाने मोदींचं गुणगाण गायलं, अशी टीका सोनिया गांधी यांनी केलीये.

 

 

थोडक्यात बातम्या- 

शिवसेनेच्या माजी आमदाराचं बंड; पंढरपूरनंतर आता देगलूरही महाविकास आघाडीच्या हातातून जाणार का?

ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या वृद्ध महिलेनं युवकासाठी सोडला स्वतःचा बेड, म्हणाल्या….

पुण्यातील हत्येचं सत्र सुरूच; साताऱ्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या आईची पुण्यात हत्या

‘त्या’ पत्रावरून आचार्य तुषार भोसले यांची शरद पवारांवर बोचरी टीका, म्हणाले…

मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या- खासदार संभाजीराजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More