देश

“संपूर्ण देश सैन्यासोबत उभा आहे, तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहणार?”

नवी दिल्ली | चीनकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी देशाची दिशाभूल केल्याचं संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे, असं म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधलाय.

चीनविरोधात कधी उभे राहणार आणि चीनकडून आपली जमीन कधी परत घेणार? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.

मोदींनी चीनच्या अतिक्रमणावरून देशाची दिशाभूल केल्याचं संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झालं आहे. आपला देश कायम सैन्यासोबत उभा होता, आहे आणि राहील, असं राहुल गांधींनी म्हटलंय.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाची माहिती दिली. यावरून काँग्रेसने मोदींवर टीका केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“राजभवनाचं सध्या आरएसएस शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून नामकरण करावं का?”

शरद पवारांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी- खासदार संभाजीराजे़

‘महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी’; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जया बच्चन यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पसंती ऑनलाईनलाच!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या