महाराष्ट्र मुंबई

“भविष्यात अपयशाच्या केस स्टडीमध्ये कोरोना, GST आणि नोटबंदी शिकवलं जाईल”

मुंबई | देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोना व्हायरसवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राहुल यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

भविष्यात हॉवर्डमध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा कोविड, नोटबंदी आणि जीएसटी या तीन गोष्टींचा उल्लेख असेल, असा टोला राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.

काही दिवसांपूर्वीही राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला होता. केंद्राकडे कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी कोणतीही योजना नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला होता.

कोरोना व्हायरस देशाच्या नव्या भागांत अत्यंत वेगाने पसरत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी, त्याविरोधात लढण्यासाठी मोदी सरकारकडे कोणतीही योजना नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत बसले आहेत. त्यांनी या रोगापुढे आणि त्याच्या वाढत्या प्रादुर्भावापुढे सरेंडर केलं आहे, असंही राहुल गांधी म्हणाले होते.

 

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेना-राष्ट्रवादीत फोडाफोडीचं राजकारण; पारनेरमध्ये शिवसेनेला, कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका!

स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण

महत्वाच्या बातम्या-

आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु आहे- देवेंद्र फडणवीस

‘…आता परीक्षा देवाची’; प्रवीण तरडेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

मी ओबीसी म्हणून मला त्रास दिला जातोय- विजय वडेट्टीवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या