देश

मोदीजी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवतायेत, पण…- राहुल गांधी

नवी दिल्ली | सरकारकडून मांडण्यात आलेल्या कृषि विषयक विधेयकावर राज्यसभेत प्रचंड गदारोळ सुरू आहे. या विधेयकावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी दोन प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना गुलाम बनवलं जात असल्याचं म्हणत नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडल आहे.

मोदी सरकारच्या कृषि विरोधी काळ्या कायद्यांमुळे शेतकरी बाजार नष्ट होतील, मग एमएसपी कशी मिळणार?, एमएसपीची खात्री का नाही?, असे प्रश्न राहुल गांधींनी सरकारला विचारले आहेत. मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहे. पण देश हे कधीही यशस्वी होऊ देणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

कृषि क्षेत्राशी संबधित असलेल्या तीन विधेयकांपैकी दोन विधेयके आज प्रचंड गदारोळात राज्यसभेत मंजूर झाली. या विधेयकांना काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी तीव्र विरोध केलाय.

महत्वाच्या बातम्या-

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न!

पुढच्या 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

‘पोलिस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता’; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

“मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण न करता साथ दिली पाहिजे”

“उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या