देश

“मोदी मनमोहन सिंह यांची खिल्ली उडवायचे; देश आज मोदींची खिल्ली उडवत आहे”

चंदीगड | पंतप्रधान नरेंद्र मोदी मनमोहन सिंहांची नेहमी खिल्ली उडवायचे पण देश आज मोदींची खिल्ली उडवत आहे, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका केली आहे.

मोदींना वाटत एकटा माणूस देश चालवू शकतो. पण असं नसून देश लोक चालवत असतात, असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे. ते पंजाबमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

युपीए सरकार असताना नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची खिल्ली उडवत होते. मात्र आता त्यांनी तसं करण बंद केलं आहे, कारण देशातील जनतने आता त्यांची खिल्ली उडवण सुरू केलं आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी आरएसएसचा किंवा भाजपचा माणूस नाही,पण काँग्रेसचा आहे. त्यामुळे मोदींच्या द्वेषाला मी प्रेमाने उत्तर देईन, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-मोहरमची वेळ बदला, दुर्गा पुजेची नाही- योगी आदित्यनाथ

-ममता दीदींनी 24 तासातच बदला घेतला; मोदींचे ममतांवर टीकास्त्र

-आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल

-मराठा समाजातील एकाही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही- चंद्रकांत पाटील

‘स्व-रुपवर्धिनी’च्या मोफत MPSC शिष्यवृत्तीची घोषणा; 1 तारखेपासून करता येणार अर्ज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या