नवी दिल्ली | कोरोना आणि लॉकडाऊनने ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावर आणण्यासाठी कोणत्या उपायोयजनांची गरज आहे, तसंच सरकारच्या दृष्टीने काय पावलं उचलली पाहिजेत या आणि अशा बऱ्याच मुद्द्यांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला.
अभिजीत बॅनर्जी यांनी मुलाखतीलाच्या सुरूवातीलाच युपीए सरकारच्या तत्कालिन निर्णयांचं कौतुक केलं. काँग्रेस सरकारने घेतलेले निर्णय आताच्या संकटाच्या काळआत प्रभावी ठरत असल्याचं बॅनर्जी म्हणाले. तसंच सध्याच्या काळात सरकारने लघु, मध्यम उद्योगांना विशेष पॅकेज देण्याची आवश्यकता असल्याचं मतंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
अभिजीत बॅनर्जी यांनी लॉकडाऊनवर देखील दीर्घ भाष्य केलं. आता भारताने लॉकडाऊन उठवण्याची गरज आहे. आर्थिक संकटातून जर आपल्याला बाहेर पडायचे असेल तर लॉकडाऊन उघडलं गेलं पाहिजे. तसंच लॉकडाऊनचे अधिकार केंद्राकडे न राहता ते राज्यांना द्यायला हवेत, असं मतंही त्यांनी यावेळी आवर्जून नोंदवलं.
कोरोनाचा पर्याय आज किंवा उद्या संपणार नाही. लवकरात लवकर लॉकडाऊनमधून बाहेर पडणं गरजेचं आहे.तसंच लॉकडाऊनंतर चांगल्या उपाययोजनांची गरज आहे, असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले
“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेस सरकारने चालू केलेल्या अनेक योजना या संकटाच्या काळात प्रभावी ठरतायेत- अभिजीत बॅनर्जी
“हिंदू मुस्लिम राजकारण करणाऱ्यांनी कालच्या हल्ल्यातलं इन्स्पेक्टर काझी यांचं बलिदान विसरू नये”
काश्मिरमधील शहीदांच्या कुटुंबावरही कुणीतरी फुले उधळा- संजय राऊत
Comments are closed.