बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तेव्हाच्या पंतप्रधानांमध्ये आणि सध्याच्या पंतप्रधानांमध्ये ‘हा’ फरक आहे”

नवी दिल्ली | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षामध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या खेळी चालूच आहेत. दोन्हा बाजूचे नेते एकमेकांना टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत. अशातच आता काँग्रेसने नरेंद्र मोदींच्या बॅनरबाजीवरुन त्यांच्यावर कडाडून हल्ला केला आहे.

21 जून रोजी देशात रेकॉर्डब्रेक लसीकरण झालं. एका दिवसात तब्बल 80 लाख नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. या रेकॉर्डब्रेक लसीकरणानंतर राहुल गांधीं यांनी देखील कौतुक केले. लसीकरणाच्या या विक्रमानंतर सर्वत्र नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावून अभिनंदन केलं जात आहे. याच बॅनरबाजीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

यावेळी रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले की, मनमोहनसिंग सरकारच्या काळात फेब्रवारी 2012 मध्ये देशात एका दिवसांत रेकॉर्डब्रेक पोलिओ डोस देण्यात आले होते. मात्र, याचे बॅनर झळकविण्यात आले नाहीत. तेव्हाच्या पंतप्रधानांमध्ये आणि सध्याच्या पंतप्रधानांमध्ये हाच फरक आहे.

दरम्यान, यावेळी राहुल गांधी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एका दिवसांत 80 लाख डोस देऊन काहीही होणार नाही. तर दररोज 80 लाख नागरिकांना डोस दिले गेले पाहिजेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘या’ दिवसापासून सुरू होणार विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन

“बारमध्ये गर्दी चालते, उद्घाटनाला गर्दी मग अधिवेशन का नको?, सरकार आहे की तमाशा”

“महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत”

शिवसेना-भाजप युतीबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य म्हणाले…

विजय शिवतारेंच्या मुलीचे खळबळजनक आरोप, फेसबुक लाईव्हद्वारे आईचं प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More