नवी दिल्ली | भाजप आणि आरएसएसला या कर्नाटक निवडणुकीमधून चांगलाच धडा मिळालाय, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला मारला. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर राष्ट्रगीत सुरु असताना भाजप नेते विधानसभेतून बाहेर पडले हे तुम्ही पाहिलंच आहे, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणाला सुरुवात केली.
भाजपनं कर्नाटक, गोवा आणि मणिपूरमध्ये जनादेशाचा अपमान केला. मात्र पंतप्रधान हे सर्वोच्च न्यायालय, जनता आणि लोकशाहीपेक्षा मोठे नाहीत हे त्यांनी स्पष्ट झालं. भाजपला त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पावती मिळाली, असंही ते म्हणाले.
देशाच्या न्यायव्यवस्थेशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप आणि आरएसएसला आम्ही लढा देणार आणि त्यांना रोखणार, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
-बेगडी राष्ट्रप्रेम, राष्ट्रगीताआधीच भाजप आमदारांचा काढता पाय!
-येडियुरप्पांचा राजीनामा; आता पुढे काय होणार???
-दुपारीच झाला होता निर्णय; आकडे न जुळल्यानं होते अस्वस्थ!
-येडियुरप्पांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपला मोठा धक्का
-येडियुरप्पांच्या राजीनाम्याच्या शक्यतेला दुजोरा देणारी दृश्यं समोर
Comments are closed.