राहुल गांधी हिंदूच, पाहा दिला आणखी एक पुरावा!

अहमदाबाद | गुजरातच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची मंगळवारी सांगता झाली. मात्र जाता जाता घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आपण हिंदू असल्याचा पुरावा दिला आहे. 

पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ पहायला मिळाली. राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी यांना रुद्राक्षाची माळ घालायला आवडत असे, मात्र राहुल यांनी अशाप्रकारची माळ घातल्याचं पहिल्यांदाच पहायला मिळतंय. 

दरम्यान, राहुल गांधी हिंदू नसल्याचा मुद्दा ऐन गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने उपस्थित केला होता. तसेच त्यांना या मुद्द्यावरुन घेरण्याचा प्रयत्न देखील केला होता.