बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ट्रॅक्टर घेऊन राहुल गांधींची संसदेत एंट्री; कृषी कायद्याविरोधात काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी तळ ठोकून बसले आहेत. केंद्र सरकारने केलेले 3 कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यातच आता काँग्रेसने देखील कृषी कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या दिल्लीत लोकसभेचं पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात काँग्रेसने सरकारला धारेवर धरलं आहे.

कृषी कायद्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्रॅक्टर मार्च काढला आहे. राहुल गांधी स्वतः ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहचले. ट्रॅक्टर घेऊन त्यांनी संसद परिसरात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, संसदेच्या गेटवरच त्यांना अडवण्यात आलं. अचानक राहुल गांधी टॅक्टरवरून संसदेत पोहचल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आम्ही शेतकऱ्यांचा आवाज संसदेत पोहोचवू. संसदेत या कायद्याची चर्चा झाली नाही. हा शेतकऱ्यांसाठी काळा कायदा असून, त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. हा कायदा मागे घेतलाच पाहिजे हा कायदा शेतकऱ्यांसाठी नसून काही 2-3 बड्या उद्योगपतींसाठी असल्याचं देखील राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, नवीन कृषी कायदे हे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. या शेतकरी कायद्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. तर कायद्यात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर काँग्रेसने देखील आक्रमक भूमिका घेत कृषी कायद्यांना विरोध केला होता.

थोडक्यात बातम्या-

“भास्कर जाधवांचा अरेरावीचा प्रकार मालकाला खूश करण्यासाठी”

मोठी बातमी! कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केली राजीनाम्याची घोषणा

बॉसने दरडावल्याने तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More