विरोधकांच्या मोर्चासाठी राहुल गांधी यांना आमंत्रण, नेतृत्व शरद पवार करणार

मुंबई | 12 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांच्यावतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीकडून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून निमंत्रित करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.

विरोधी पक्षाचा नागपूरमधील विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे देखील मोर्चात सहभागी होणार आहेत.

शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांची आत्महत्या अशा अनेक मुद्द्यांवर हे आंदोलन होणार आहे.