बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधी प्रामाणिक आणि उमदं नेतृत्व, त्यांचं स्वप्न साकार होवो- संजय राऊत

मुंबई | आज काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनेही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच शिवसेना पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या आहेत.

राहुल गांधी देशाचे प्रमुख नेते आहेत. त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. त्यांच्याकडून पक्षाची बांधणी वेगाने होवो, देशाच्या राजकारणातील त्यांचं स्थान बळकट होवो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

शिवसेना यापुढे देशाच्या राजकारणात प्रखरतेने दिसेल, असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेला लोक म्हणत होते की शिवसेना मुंबई-ठाण्याच्या पुढे जाणार नाही. पण शिवसेना महाराष्ट्रभर पसरली, आता महाराष्ट्राच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज राहुल गांधी यांचा वाढिदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करणार असल्याचं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं होतं. कोरोनामुळे बेरोजगारीला सामोरे जावं लागणाऱ्या गरिबांना तांदुळ, गहू अशा गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“राणे नावाने शिवसेना घाबरते, पुन्हा समोर आल्यास जोरदार उत्तर द्या”

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्या- प्रविण दरेकर

30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

‘भाजपचं ओळखपत्रं दाखवा अन् मोफत पेट्रोल मिळवा’; शिवसेनेची खास ऑफर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More