बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांनी केलं राहुल गांधींचं कौतुक, म्हणाले…

औरंगाबाद | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. राहुल गांधी प्रामाणिक नेते असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत औरंगाबादमध्ये जय भीम फेस्टिव्हलमध्ये आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. प्रसिद्ध राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी संजय राऊतांची मुलाखत घेतली. यामुलाखतीमध्ये बोलताना संजय राऊतांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

मी उद्धव ठाकरेंना वेळोवेळी म्हणतो तुम्ही दिल्लीत गेलं पाहिजे. देशात सध्या नेते दिसत नाही. राहुल गांधी एक प्रामाणिक नेता आहे. सत्तेची ताकद आणि पैसा राहुल गांधीचं खच्चीकरण करण्यास वापरला जात आहे. राहुल गांधींपेक्षा अनेक बोगस लोक आहेत. काँग्रेस पक्ष फोडला जात आहे. काँग्रेस नेत्यांनी गांधी आणि काँग्रेसच्या नावावर भरपुर पैसा कमवला. त्यामुळं ते घाबरत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसेच ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच सरकारमधील कोणताही पक्ष किंवा आमदार कुठेही जाणार नाही, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना इडीवर देखील टीकास्त्र सोडलं. ईडीचे काम बेहिशोबी पैसा बाहेर काढणे हे आहे. काळा पैसा बाहेर काढू असं भाजप म्हणालं होतं. 7 वर्षात काय केलं? मोदींचे माझे चांगले संबंध आहेत. महाराष्ट्र सरकार गेल्याने माझ्या मागे ईडी लावली. बायकांना नोटीस देता आम्हाला द्याना, असं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती, पण…- संजय राऊत

‘मुख्यमंत्र्यांचं आता त्यांचे युवराजही ऐकत नाहीत का?’; व्हिडिओ शेअर करत मनसे नेत्याची आदित्य ठाकरेंवर टीका

“काही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दुकानं चालवून संसदेत जातात”

पूजा चव्हाणची आजी म्हणणाऱ्या शांताबाईंचं पितळ उघडं, पूजाच्या वडिलांनी केला मोठा खुलासा

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More