बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“170 आमदार असून काय उपयोग?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे”

मुंबई | विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. कोरोना संसर्ग रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या वर्षीच पावसाळी आधिवेश केवळ दोन दिवसांचं ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून राज्यातील विरोधी पक्षनेते सरकारवर खार खाऊन आहेत. यातच आधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतात. परंतू यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. यामुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं.

अशातच भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा काँग्रेस पक्षाचे नेेते राहुल गांधी बरे आहेत, असं म्हणत भातखळरांनी उद्धव ठाकरे यांना फटकारलं आहे.

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचं धाडस झालेलं नाही. 170 आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आजपासून राज्यातील पावसाळी आधिवेशनाला सुरूवात होणार असून. विधिमंडळाचं हे आधिवेशन 5 जूलै आणि 6 जूलै हे दोनच दिवस असणार आहे. यामध्ये सर्व मुद्यांवर चर्चा होणार की नाही याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच MPSC, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकरी कायदे अशा विविध मागण्यांवरून हे अधिवेशन रंगण्याची शक्यता आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘सरकारच्या डोक्यात घालण्यासाठी हे पुस्तक आणलंय’; राम सातपुते आक्रमक

‘विद्यार्थ्यांना वास्तवाचं भान असलं पाहिजे’; कलेक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांची पोस्ट व्हायरल

‘ज्यांना आजवर कोरोना झाला नाही त्यांनी…’; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

‘…मग तुमची झोप का उडाली?’; राष्ट्रवादीची शिवसेनेवर खोचक टीका

भारतीय खेळाडूची ऐतिहासिक खेळी; टी-20 मध्ये ठोकलं धुवाधार द्विशतक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More