देश

राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता; उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचं वक्तव्य

लखनऊ | राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याचे गुण असून ते देखील सरकार चालवू शकतात, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केलं आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

प्रियांका गांधी राजकारणात सक्रिय होणार असल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, असं ओमप्रकाश राजभर यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिरावरून देशाची दिशाभूल करत आहेत, अशी टीका देखील राजभर यांनी केली आहे.

दरम्यान, ओमप्रकाश राजभर हे सुहेलदेव भारतीय समता पार्टीचे अध्यक्ष असून त्यांनी युतीसाठी भाजपला 24 फेब्रुवारीची डेडलाईन दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बाप हा बाप असतो, बाप कसा बदलणार?, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

…तर भाजप खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???

“ओबीसी आरक्षणाबाबत सरकारनं गांभीर्याने कार्यवाही करावी”

ऐका मोहम्मद शमीचं इंग्लिश… ऐकून तुम्हीही हसाल!

-…आणि अजित पवारांसमोरच भिडले राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या