चंंदीगड | हरियाणामधील कुरुक्षेत्र येथील भाजपचे खासदार आणि माजी मंत्री नायब सिंह सैनी यांनी राहुल गांधींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नायब सिंह सैनी यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख मूर्ख असा केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल काहीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जर कोणी महामूर्ख असेल तर ते राहुल गांधी आहेत. कारण त्यांना नागरिकत्व कायदा काय आहे, कशासाठी आहे हेच माहित नाही. आपण कोणत्या गोष्टीचा विरोध करत आहोत याची राहुल गांधींना कल्पानाच नाही, अशी खरपूस टीका नायब सिंह यांनी केली आहे.
सीएएमुळे कोणत्याही नागरिकाचं नागरिकत्व हिसकावलं जाणार नाही ही गोष्ट राहुल गांधींना माहिती नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. भाजपने सुरुवातीपासून काँग्रेस नागरिकत्व कायद्यासंबंधी लोकांमध्ये गैरसमज परसवत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, भाजप नेते नायब सैनी यांनी काँग्रेसवर टीका करताना सरकारला घेरण्यासाठी त्यांच्याकडे अन्य कोणता मुद्दा नसल्याचं म्हटलं आहे. यामुळेच काँग्रेस कायद्यासंबंधी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
केंद्र सरकारच्या जुलमाच्या कारभारामुळे देशाचं 21 हजार कोटींचं नुकसान- राष्ट्रवादी – https://t.co/MK0Kihcmfo @NCPspeaks @PawarSpeaks @narendramodi @BJP4Maharashtra #म
— थोडक्यात (@thodkyaat) December 31, 2019
काँग्रेसच्या ‘या’ आमदाराला मंत्रिपद देण्यासाठी पक्षश्रेष्ठींना लिहिणार रक्तानं पत्र! – https://t.co/lm47j6kyHe @ShindePraniti @INCMaharashtra #म
— थोडक्यात (@thodkyaat) December 31, 2019
उद्धवा, अजब तुझे सरकार!; किरीट सोमय्यांचं शिवसेनेवर टीकास्त्र – https://t.co/7OxjPxqcv9 @KiritSomaiya @OfficeofUT @ShivSena @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) December 31, 2019
Comments are closed.