राहुल गांधींना मी नेता मानत नाही; काँग्रेसच्या नेत्याचा घरचा आहेर

नवी दिल्ली | काँग्रेसच्या अडचणी कमी होत नाही तोच वाढत आहेत. काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते हंसराज भारद्वाज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना घरचा आहेर दिला आहे.

राहुल गांधी हे नेते आहेत असे मी अद्याप मानत नाही. कारण राहुल गांधी यांना जनतेने अद्याप नेता म्हणून स्वीकारलेले नाही, असं त्यांनी म्हटलं.

सध्या राहुल गांधी शिकत आहेत. जेव्हा जनता त्यांना स्वीकारेल तेव्हाच ते नेते होतील असे मी मानतो असं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, एवढेच नाही तर काँग्रेस पक्षाकडून धर्माचे राजकारण होत असल्याने हा पक्ष अपयशी ठरतो आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-संघाच्या लाठीवर बंदी घालावी; न्यायालयाने बजावली नोटीस

-तुम्ही मला वाघिण म्हणा की नागिण काम मात्र नियमानुसारच होणार!

पृथ्वीराज चव्हाणाची अवस्था पिंजऱ्यातल्या वाघासारखी झाली आहे- दिवाकर रावते

-आफ्रिदी म्हणे ‘तो मी नाही’; भारतीय प्रसार माध्यमांवर केला आरोप

-फडणवीस सरकार आमचा छळ करत आहे, मेलो तरी मागे हटणार नाही- मराठा आंदोलक