देश

“राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला राहुल गांधीच जबाबदार”

जयपूर | राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला काँग्रेस नेते राहुल गांधीच जबाबदार आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी केला आहे.

काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना राहुल गांधी मोठं होऊ देत नाहीत. मध्य प्रदेशातल्या परिस्थितीलाही राहुल गांधीच जबाबदार होते, असं उमा भारती म्हणाल्या आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत होती. आता सचिन पायलट यांची परिस्थितीही काही फारशी वेगळी नाही, असं उमा भारती यांनी म्हटलंय़.

दरम्यान, राजस्थानमध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता आली तेव्हा अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. तेव्हापासूनच सचिन पायलट हे नाराज असल्याचं बोललं जात होतं. आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्यासोबत 102 आमदार आहेत हा जो दावा केलाय तो चुकीचा आहे, असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी, बघू ते मुलाखत देतात का?- संजय राऊत

धक्कादायक! भाजप मंत्र्याच्या मुलाला रोखल्यामुळे पोलिस महिलेला द्यावा लागला राजीनामा

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांनो आतातरी घरी बसा, आयसीयू, ऑक्सिजन अन् बेडही नाहीत!

‘नया है वह’ म्हणत फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका, संजय राऊतांचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

खळबळजनक! भाजप आमदाराचा फास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या