बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू”

नवी दिल्ली | केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन चालू आहे. मुज्जफरनगर येथे नुकतीचं शेतकऱ्यांची महापंचायत झाली. या पंचायतीला देशभरातून शेतकरी उपस्थीत होते. यांच्या समर्थनार्थ काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यानी एक फोटो ट्वीट केला होता. त्यावरून राजकारण पेटलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट केलेला फोटो हा फेब्रुवारीतला आहे. यावरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू आहेत, अशी जहरी टीका केली आहे. कोकीळ हा पक्षी नेहमी दुसऱ्यांच्या घरट्यावर आनंदी होत असतो, अशी जोरदार टीका संबीत पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

काॅंग्रेस पक्षाला काही भविष्य नाही. राहुल गांधी हे आपल्या अशा वागण्याने वारंवार स्वत: ला खोटं असल्याचं सिद्ध करतात. लोकांच्या मागण्या काय आहेत हे त्यांना कळत नाही. रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करावं लागतं. राहुल गांधी यांना या गोष्टी समजत नाहीत, अशी टीकाही भाजपने केली आहे.

देशात जेव्हा ही चुकीची माहिती पसरवण्याचं काम होतं तेव्हा त्यात राहुल गांधी यांचा हात असतो. खोटारडेपणाचं राजकारण करून राहुल गांधी काय सिद्ध करणार आहेत?, असा सवाल ही भाजपने केला आहे. राहुल गांधी यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवू नये, असा सल्लाही भाजपने राहुल गांधी यांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या 

चिमुकल्यासाठी सफाई कामगार ठरला देवदूत; पाहा ‘हा’ थरारक व्हिडीओ

FD करण्याचा विचार करताय?, थांबा, ‘या’ पर्यायांचा विचार करा आणि मालामाल व्हा!

कोव्हिशील्ड लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात महत्वाची बातमी; उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली ‘ही’ मोठी मागणी

“उद्धव ठाकरेंसह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More