Top News देश राजकारण

राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा अभाव आहे; शरद पवारांचे स्पष्ट मत

मुंबई | बिहार निवडणूकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागली. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं असून राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा अभाव असल्याचं म्हटलं आहे.

शरद पवार म्हणाले, “आजच्या घडीला गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळते. सोनिया गांधी, राहुल गांधी हे दोघेही त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत असल्याने बरेच नेते हे त्यांच्या विचारांचे आहेत. आणि ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे.”

देशात राहुल गांधी यांचं नेतृत्व मानायला तयार आहे का? या प्रश्नाला उतर देताना, राहुल गांधी यांच्यामध्ये काही प्रश्न आहेत. राहुल गांधी यांच्या कामात सातत्याचा थोडासा अभाव आहे, असं परखड उत्तर शरद पवारांनी दिलंय.

दरम्यान ओबामा यांनी त्यांची स्वतःची मतं त्यांच्या पुस्तकात मांडलीयेत. आणि आपली मतं मांडण्याचा सर्वांना अधिकार असल्याचंही, पवार म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

“शेठजी लायटिंग छान होती आणि तुमचा डान्स तर लाजवाबच”

अमरीश पटेल यांचा विजय सत्ताधाऱ्यांसाठी मोठा राजकीय धक्का- गिरीश महाजन

शीतल आमटेंच्या आत्महत्येबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या