Rahul Gandhi | अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) पायी वारी करणार आहे. याआधी राज्याचे माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पवार हे पायीवारी करणार असल्याची चर्चा होती. मात्र आता राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील शरद पवारांप्रमाणे पायी वारी करणार असल्याची चर्चा आहे.
राहुल गांधी वारीत सहभागी होणार?
येत्या 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यासाठी संतांच्या पालख्या राज्यभरातून पंढरपूरला जाताना दिसतात. ही महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. या वारीत राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील आपली उपस्थिती लावणार असल्याची माहिती आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) आषाढी एकादशी आधी पायी वारीत सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह हा वाढला आहे.
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने चांगली कामगिरी केली. तर दुसरीकडे काँग्रेसने तब्बल 13 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये एक नवचैतन्य संचारलं आहे. दरम्यान याआधी राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करत होते. यात त्यांनी देश पिंजून काढला आहे. त्यामुळे त्यांना पायी वारीत चालताना कोणताही त्रास होणार नाही. मात्र राहुल गांधी आता खरोखर पायी वारीत चालणार का हे पाहणं गरजेचं असेल.
राहुल गांधी 13 किंवा 14 जुलै रोजी पंढरपुरात येणार आहेत आणि विठुरायाचं दर्शन घेणार आहेत. याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दुजोरा दिला आहे. 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. यासाठी 13 किंवा 14 जुलैला राहुल गांधी विठ्ठल मंदिरात दर्शन घेणार आहे. त्यांना पालखी सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. पालखी माळशिरास येथे आल्यानंतर माळशिरस ते वेळापूर येथे ते वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच शरद पवार देखील पायी वारी करणार आहेत.
शरद पवारांची पायीवारी
शरद पवार हे पायी वारी करणार आहे. ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’, हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक आणि विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते या दिवशी वारीत वायी वारी करताना दिसतात. शरद पवार देखील बारामती ते इंदापूरच्या सणसरपर्यंत 17 किमीचा पायी वारी करत प्रवास करणार आहेत.
News Title – Rahul Gandhi May Be Participate In Ashadhi Wari In Maharashtra Walk Will Pandharpur
महत्त्वाच्या बातम्या
“पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, मग बीडचा विकास का केला नाही?”
“…तर निवडणूक स्वतंत्र लढावी लागेल”; अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य
वयाच्या 50 शीत मलायकाला प्रेमात मिळाला धोका?; अर्जुनच्या वाढदिवशी केली क्रिप्टिक पोस्ट
पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील 7 दिवसांसाठी चंद्रकांत पाटील यांनी केली ‘ही’ घोषणा
पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, मृताच्या आईचा संताप