नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसच्या नेत्यांना भेटत नाहीयेत. किंबहुना त्यांना वेळ देत नाहीयेत. पण स्वत: राहुल गांधी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला आले आहेत.
Congress President Rahul Gandhi arrives at NCP leader Sharad Pawar's residence in Delhi. More details awaited. pic.twitter.com/wLa1R5Gl0p
— ANI (@ANI) May 30, 2019
राजधानी दिल्लीत एकीकडे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची धूम आहे तर दुसरीकडे राहुल गांधी आणि शरद पवार यांची ‘6 जनपथ’ या पवारांच्या निवासस्थानी भेट होत आहे.
राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे, असं वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’ आणि ‘न्यूज 18 लोकमत’ यांनी दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन झाला तर काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपद मिळू शकते.
दरम्यान, या बैठकीत नेमकं काय गुप्तगू होतंय, हे अद्याप कळू शकलं नाहीये. (बातमी अपडेट होत आहे)
महत्वाच्या बातम्या
-महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपदं!
-जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार- निलेश राणे
-हाशिम अमला विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम मोडणार; आज रचणार इतिहास?
-जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री; घेतली गोपनियतेची शपथ
-हेमा मालिनी म्हणतात, मोदीजींच्या डोक्यात देशासाठीचा सगळा प्लॅन रेडी…
Comments are closed.