राहुल गांधींनी शरद पवारांची घेतली भेट आणि आघाडीचा तिढा सुटला!

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शदर पवरांची त्यांच्या दिल्लीतील घरी भेट घेतली. या भेटीत लोकसभेच्या राज्यातील 48 पैकी 45 जागांवर तोडगा निघाला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अमरावती, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन मतदार संघाव्यतिरिक्त सर्व जागांची सहमती झाली असल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसात सर्वच जागांवर उमेदवार आणि जागावाटप निश्चिती होण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय घेऊन भाजप आणि शिवसेनेला एक नवं आव्हान दिलं आहे. 

दरम्यान, जागावाटप झाल्यानंतर पवार आणि राहुल गांधींच्या एकत्रित सभा होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अनिल अंबानींना 30 हजार कोटी देण्यासाठी नरेंद्र मोदींनी केला राफेल करार- राहुल गांधी

प्रितम मुंडेंच्या विरोधात अमरसिंह पंडित निवडणूक लढणार??

विरोधकांचा पाच वर्षात कोणताही राजकीय भूकंप नाही; मोदींचा राहुल गांधींना टोला

युतीच्या चर्चेसाठी गडकरी, शहा ‘मातोश्री’चा उंबरा ओलांडणार?, हालचालींना वेग

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; मुलायम सिंग यादवांनी दिल्या शुभेच्छा

Google+ Linkedin