Top News राजकारण

काँग्रेस पक्षाचा आधारस्तंभ हरपला; राहुल गांधीची अहमद पटेल यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली | काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झालंय. अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिलीये.

पटेल यांच्या निधनानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिलीये. हा एक दु: खद दिवस असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

राहुल गांधी म्हणतात, आजचा हा एक दु: खद दिवस आहे. अहमद पटेल हे काँग्रेसचे आधारस्तंभ होते. पक्षाच्या सर्वात कठीण काळात ते पक्षासोबत उभे होते. त्यांनी काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल.”

दरम्यान, अहमद पटेल यांना 1 महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी ते संसदेच्या पावसाळी आधिवेशनात सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या-

ईडी हे त्यांच्या हातचं बाहुलं झालं आहे- छगन भुजबळ

“हात बरबटलेले नसतील तर ईडीची भीती कशाला?”

“…त्यामुळे भाजपने शिवसेनेशी युती केली, मात्र शिवसेनेनं त्यांची जात दाखवली”

शुद्र राजकारण करणं योग्य नसतं पण…- शरद पवार

प्रताप सरनाईकांवरील ईडीने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या