बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपसारखं आम्ही ज्येष्ठ नेत्यांना विसरत नाही- राहुल गांधी

नवी दिल्ली | वरिष्ठांना सोबत घेऊन तरुण नेतेच आता काँग्रेसला पुढे नेतील, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. आम्ही भाजपप्रमाणे ज्येष्ठ नेत्यांना विसरत नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 84 व्या महाअधिवेशनात ते बोलत होते. काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी सोनिया गांधी मनमोहन सिंग यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी अजूनही कष्ट घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

भाजप सरकार जनतेच्या मनात द्वेष निर्माण करु लोकांना आपापसांत भिडवून त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र काँग्रेसचा पंजा लोकांमध्ये सलोखा निर्माण करु शकतो, असंही ते यावेळी म्हणाले. 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More