जीएसटीसाठी रात्री संसद भरते, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही!

जयपूर | शेतकऱ्यांसाठी भाजप सरकारला वेळ नाही, अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर टीका केली. राजस्थानच्या बंसवारा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

संसदेत आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायचे असते. मात्र, आम्हाला बोलू दिले जात नाही, असा आरोप राहुल यांनी यावेळी केला.

तसेच जीएसटीसाठी मध्यरात्री संसद सुरु ठेवू शकते, त्या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी थोडाही वेळ नाही. हाच भाजपचा खरा चेहरा असल्याचंही ते यावेळी म्हणाले. 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या