Top News देश

ट्रम्प यांची भारताला धमकी; राहुल गांधींचं सणसणीत प्रत्युत्तर

नवी दिल्ली | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या पुरवठयावरुन भारताला धमकी दिली होती. ट्रम्प यांच्या धमकीला आता काँग्रेस नेते राहुल गांधी प्रत्युत्तर दिलं आहे.

मैत्री म्हणजे प्रत्युत्तर देणे नसते. कोरोनासारख्या संकटाच्या काळात भारताने इतर देशांना जरूर मदत केली पाहिजे. मात्र, जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेली औषधे भारतात पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या पुरवठयावरुन भारताला धमकी दिली होती. त्यानंतर आता भारताने 24 औषधांवरची निर्यातबंदी उठवली आहे. अमेरिकेच्या दबावानंतर ही निर्यातबंदी उठवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर मागच्या महिन्यात काही औषधांच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र अमेरिकेच्या धमकीनंतर भारताने आता ही निर्यातबंदी तातडीने उठवली आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

… तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

महत्वाच्या बातम्या-

मोदी जनतेचं मनोबल वाढवत आहेत, त्यांच्यावर टीका करणं चुकीचं- प्रवीण दरेकर

आपल्याला हनुमानासारखी पर्वत उचलायची नाहीत, जयंतीला घरीच थांबा- अजित पवार

मोदी सरकारचं दुसरं आर्थिक पॅकेज; या क्षेत्रांना मिळणार मोठा दिलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या