Top News

देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत राहुल गांधी म्हणतात…

Loading...

नवी दिल्ली |  अर्थव्यवस्थेची हालत काही बरी नाही, असं सध्या सगळीकडे चित्र आहे. सत्ताधारी भाजपकडून अर्थमंत्री आणि वाणिज्य मंत्र्यांनी या सगळ्याला अजब कारणं दिली आहेत. त्यानंतर माजी काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या वक्तव्यावर चांगलेच भडकले आहेत.

देशाच्या अर्थव्यवस्थेला मुर्ख कहाण्या पसरवण्याची नाही, तर ठोस उपाययोजनांची गरज आहे, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Loading...

भारतीय अर्थव्यवस्थेला मतप्रचार, बातम्या आणि मुर्ख कहाण्या पसरवण्याची गरज नाही. तर अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी ठोस उपाययोजन करण्याची गरज आहे. अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे, हे कबूल करणे ही देखील एक चांगली सुरूवात आहे, असा सल्लाही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीला ओला-उबर टॅक्सी सेवा वापण्याची लोकांची मानसिकता कारणीभूत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केलं होतं. तर टीव्हीवरच्या आकड्यांवर जाऊ नका. आकडेवारीवर अर्थव्यवस्थेवर चालत नाही, असं वाणिज्यमंत्री गोयल म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या