सत्तेत आल्यानंतर ‘जीएसटी’चा कायापालट करणार- राहुल गांधी

सुरत | 2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने लागू केलेल्या जीएसटीत व्यापक बदल करण्याचं आश्वासन काॅंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलंय.

सत्ता आल्यानंतर तुमच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला अनुकूल असणारे बदल करण्यात येतील असं त्यांनी सुरतमधील व्यापाऱ्यांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, मोदी भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर बोलतात पण कधी व्यापम घोटाळा, ललित मोदी घोटाळा यावर का बोलत नाहीत, जे भाजपशासित राज्यात झालेत. असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.