हॅम्बर्ग | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गळाभेटीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलंय. तिरस्काराला तिरस्कारानेच प्रत्युत्तर देणं मूर्खपणा आहे. भारतीय या शब्दाचा अर्थ अहिंसक होतो. म्हणूनच मोदींची गळाभेट घेऊन मी तिरस्काराला प्रेमानं उत्तर दिलं, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटलंय.
नरेंद्र मोदी यांना मिठी मारण्याचा प्रकार काँग्रेस पक्षातीलही काही सदस्यांना पटला नाही, असंही यावेळी राहुल यांनी सांगितलं. जर्मनीतील हॅम्बर्ग इथल्या बुसेरियस समर स्कूलमधील विद्यार्थ्यांशी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी माझ्याबद्दल द्वेष पसवणारी टीका करत आहेत. मी त्यांच्याबद्दल स्नेह दाखवला. हे जग द्वेषाने नाही, तर प्रेमाने चालतं, हे सांगण्याचा प्रयत्न केला, असा टोला त्यांनी लगावला.
LIVE: CP @RahulGandhi addresses a gathering at Bucerius Summer School, Germany. #WillkommenRahulGandhi https://t.co/OeiNci1zhS
— Congress (@INCIndia) August 22, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-… म्हणून सोनिया गांधींनी नितीन गडकरींना दिले धन्यवाद
-सेल्फी काढण्याचा नाद वाईट; सगळं कुटुंबच गेलं वाहून!
-विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला नागडा करून हाणला!
-इंग्रजांच्या तुकड्यावर जगणारे आता अंबानींच्या तुकड्यावर जगत आहेत!
-कोणत्या कंपनीचं प्रोटीन खातो?,चाहत्याचा रणवीर सिंगला प्रश्न