मोदींनी विमानातून काळा पैसा भारतात आणला असेल!

नवी दिल्ली | वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवरुन परतणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काळ्या पैशासंदर्भात चांगलाच टोला लगावलाय. त्यांनी ट्विटरवर यासंदर्भात ट्विट केलेत.

प्रिय पंतप्रधान, तुमचं भारतात स्वागत आहे. स्वित्झर्लंडमधून येताना तुमच्या विमानातून  तुम्ही काळा पैसा भारतात आणला असेल तर भारतीय तरुणांना आश्चर्य वाटेल, अशा आशयाचं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय. 

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर साधलेला निशाणा नेटकऱ्यांनीही डोक्यावर घेतल्याचं दिसतंय. कारण राहुल यांच्या या ट्विटला मोठ्या प्रमाणावर रिट्विट्स मिळत आहेत तर काहीजण या ट्विटची खिल्लीही उडवत आहेत.