Rahul Gandhi l लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोदी सरकार स्थापन झालं आहे. मात्र आता लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवरून एक मुद्दा चर्चेत आला आहे. लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा देऊ असं मोठं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.
राहुल गांधी लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा देणार? :
लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवर राहुल गांधी यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा देऊ मात्र त्यासाठी राहुल गांधींनी एक अट घातली आहे. यावेळी त्यांनी लोकसभेचं उपाध्यक्ष पद विरोधकांना मिळालं पाहिजे अशी अट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एनडीए सरकारसमोर ठेवली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. फोनवरुन राजनाथ सिंह यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठीच्या एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा द्यावा अशी विनंती मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. यावर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे. राजनाथ सिंह यांनी केलेली विनंती आम्ही मान्य करुन एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा देऊ, पण लोकसभेचं उपसभापति पद मात्र विरोधकांना मिळालं पाहिजे अशी अट त्यांनी घातली आहे.
Rahul Gandhi l लोकसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध होणार? :
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील विरोधक सभापतीपदासाठी पाठिंबा देण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र त्यांनी देखील उपसभापतीपद आम्हाला मिळावं हीच आमची मागणी असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, याबाबत अद्याप आम्हाला कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनडीए सरकारने ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदाचं उमेदवार बनवलं आहे. ते आज उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत. तसेच उद्या म्हणजेच बुधवारी सभापतीपदाची निवडणूक देखील होणार आहे. जर विरोधकांनी सभापतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर निवडणूक होणार नाही. कारण विरोधकांना उपसभापतीपद हवं असून ते सभापतीपदासाठी उमेदवार देण्याच्या बाजूनं नसल्याचं सांगितलं आहे.
याशिवाय सरकारच्यावतीने राजनाथ सिंह सातत्याने विरोधकांशी चर्चा देखील करत आहेत. तसेच राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी बोलून सभापती निवड बिनविरोध करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे आहे. यासंदर्भात राजनाथ सिंह म्हणाले की, सभापती बिनविरोध निवडण्याची परंपरा कायम ठेवणे गरजेचे आहे. मात्र, राजनाथ सिंह यांनी अद्याप या नावाचा कोणताही खुलासा केलेला नाही. तसेच यासंदर्भात नाव समोर आल्यानंतर खर्गे इंडिया आघाडीच्या उर्वरित पक्षांशी चर्चा करणार आहेत.
News Title – Rahul Gandhi on NDA Candidate For Lok Sabha Speaker
महत्त्वाच्या बातम्या
पोर्शे कार अपघात प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय!
सावधान! राज्यात फोफावतोय ‘हा’ संसर्गजन्य आजार; वेळीच काळजी घ्या
टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, 595 दिवसांनंतर रोहितसेना इंग्लंडचा बदल घेण्यास सज्ज
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय! महायुतीला धक्का बसणार?
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली माय मराठीतून शपथ; व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल