महाराष्ट्रातील राजकारण तापणार?; राहूल गांधी आज परभणीत, सूर्यवंशी कुटुंबाला भेटणार

Rahul Gandhi

Rahul Gandhi | परभणी हिंसाचार प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापताना दिसून आले. परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आल्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे परभणी बंदचा नारा देण्यात आला होता. या बंदमध्ये काही समाजकंटकांनी हिंसक आंदोलन केलं. यानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली. त्यात सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरुण वकिलाचा देखील समावेश होता. मात्र, न्यायालयीन कोठडीत असतानाच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. (Rahul Gandhi )

यानंतर वातावरण आणखीनच बिघडले. त्यातच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीनंतर घरी जात असताना आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांचाही ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दोन्ही घटनांचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही दिसून आले. अशात आज कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी परभणी दौऱ्यावर येत आहेत.

राहुल गांधी आज परभणीत

सोमनाथ सुर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम प्रकरणी धक्कादायक अहवाल समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. विधीमंडळात देखील विरोधी गटाकडून सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. अशात आज 23 डिसेंबररोजी देशातील मोठे नेते राहुल गांधी परभणीत येत आहेत.

आज राहुल गांधी (Rahul Gandhi )परभणीत सोमनाथ यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यास येणार असून शिवसेना आणि भाजपचे मंत्रीही परभणीत येणार आहेत. आता याला कोणते राजकीय वळण मिळणार, त्याकडे सर्वांची नजर असेल. राहुल गांधी आज आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या घरी देखील सांत्वनपर भेट देणार आहेत.

शिवसेना, भाजपचे मंत्रीही परभणीत जाणार

आज दुपारी 2 वाजता राहुल गांधी (Rahul Gandhi )परभणीत दाखल होतील. प्रथम ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतील. त्यानंतर ते विजय वाकोडे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करतील. तसेच, आज शिंदे गटाचे नेते उदय सामंत तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ देखील सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

तर, सायंकाळी भाजप नेत्या आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या दोन्ही कुटुंबांना भेट देणार आहेत. त्यातच राहुल गांधी देखील आज परभणीत येणार आहेत.त्यामुळे आता या प्रकरणाला नक्की काय वळण लागतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची तर विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली. तसेच एका पोलीस निरीक्षकाला निलंबित करत याची न्यायालयीन चौकशीचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

News Title : Rahul Gandhi on Parbhani tour today

महत्वाच्या बातम्या –

छगन भुजबळांची पुढील भूमिका ठरली?, शरद पवारांचं कौतुक करत म्हणाले…

पुणे हादरलं! मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडलं, मृतांचा आकडा समोर

मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होणार, भोलेनाथ आज ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये म्हणून करा ‘हे’ उपाय

‘मी मंत्री आहे तर पालकमंत्री पण मीच…’; महायुतीत पालकमंत्रीपदावरून वाद

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .