बिहार | मंगळवारी माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारादरम्यान कटिहारमध्ये एका सभेत जनतेला संबोधित केलं. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पहिल्यांनी घंटी वाजवली आणि नंतर फोनची लाईट देखील लावायला सांगितली. मात्र यासाठी कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही.”
कोरोनामध्ये लाखो मजूर पायपीट करून आपल्या घरी जात होते. मात्र अशा परिस्थितीत मोदी आणि नितिश कुमारांनी त्यांना मदत केली नाही. मात्र आता हे मतं मागायला येतायत, असंही राहुल म्हणालेत.
राहुल गांधी पुढे म्हणाले, “दोन कोटी लोकांना रोजगार देणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं. नितीश कुमारांनी देखील हेच सांगितलं होतं. मात्र कोणीही आश्वासन पूर्ण केलं नाही. शिवाय नोटबंदीच्या काळात केवळ देशातला गरीब माणूस रांगेत उभा होता.”
महत्वाच्या बातम्या-
‘या’ कारणाने सूर्यकुमारला टीम इंडियात जागा नाही; रवी शास्त्रींनी सोडलं मौन
“4 हजार कोटी बरबाद करण्याचा शौक असेल तर मंत्र्यांनी स्वत:च्या खिशातले उडवावे”
“…तर भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”
…हे तर महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र- किशोरी पेडणेकर
भयंकर महागाई ही भाजपकडून जनतेला दिवाळीची भेट- प्रियांका गांधी