“पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता लोकांना भ्रष्ट वाटायला लागले आहेत”

नवी दिल्ली | भ्रष्टाचाराविरद्ध लढतील असे वाटणारे मोदीच आता लोकांना भ्रष्टाचारी वाटायला लागले आहेत, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 

5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट होताच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

रोजगार, भ्रष्टाचार आणि शेतकरी या तीन मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आले होते. पण या तीनही मुद्दयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरले आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, नोटाबंदी आणि बेरोजगारी यामुळे देखील लोक नाखूष आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

महत्वाच्या बातम्या 

“राज तिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”

-लोक म्हणतात, नोटा… नोटा… नोटा; आप आणि सपालाही टाकलं मागे

-मोदींच्या सिंहासनाला तडा; राज ठाकरेंचा वर्मावर वार

-जिओच्या साम्राज्याला धक्का?; गुगलचा स्वस्तातला फोन बाजारात दाखल

-नरेंद्र मोदींनी युवकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत – राहुल गांधी