राहुल गांधींना ‘चौकीदार चोर है…’ हा उद्घोषच ‘पंतप्रधान’पदी बसवणार?

नवी दिल्ली |  गेले काही दिवस देशातलं राजकीय वातावरण ‘राफेल’ प्रकरणाने ढवळून निघालंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करतायत. याचाच प्रत्यय लखनऊच्या रॅलीमध्ये प्रियांका गांधींच्या उपस्थितीमध्ये सुद्धा पाहायला मिळाला.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अगदी काही आठवड्यांवर येऊन ठेपलाय. अशा परिस्थितीत राहुल गांधींनी आपल्या टीकेची धार अधिकच मजबूत केल्याचं दिसतंय. विविध राज्यांमध्ये होणाऱ्या सभा, रॅली, पत्रकार परिषदा यामध्ये राहुल अतिशय आक्रमक पद्धतीने मोदींवर टीका करताना पाहायला मिळत आहेत.

नरेंद्र मोदी चोर आहेत. मोदींनी अनिल अंबांनींच्या घशात 30 हजार कोटी रूपये घातले, असा आरोप राहुल सातत्याने करत आहेत. ‘द हिंदू’ च्या बातमीने त्यांच्या आरोपाला आणि टीकेला अधिकच धार चढलीय.

प्रियांका गांधींच्या राजकारणात येण्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर बदललेल्या राहुल गांधींच्या आक्रमक शैलीमुळे देशात पुन्हा राहुल यांचं नाव राजकीय पटलावर ‘फ्रंटफूट’ला आलंय. अशा या परिस्थितीत राहुल गांधींना चौकीदार चोर है… हा उद्घोषच ‘पंतप्रधान’पदी बसवणार का?…. आणि आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल आपला करिश्मा दाखवणार का? हेच पाहायचंय.

महत्वाच्या बातम्या-

-कमळ कधीच फुलणार नाही; बारामतीत पोस्टरबाजीतून भाजपला इशारा

सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना घरावर भाजपचा झेंडा लावावा लागणार??

‘हे’ माजी उपमुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?

-आघाडीला ‘राज’ साथ देणार का? अजित दादांचं आमंत्रण स्विकारणार?

मोदी सरकारचा राफेल करार यूपीएपेक्षा स्वस्त; ‘कॅग’चा अहवाल

Google+ Linkedin