बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी राजीनामा देणार म्हणजे देणार’; काँग्रेसमध्ये हालचालींना वेग

नवी दिल्ली |  मी राजीनामा देणार म्हणजे देणार, असं म्हणत राहुल गांधींनी आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचं आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करत राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर राहुल गांधींनी यावर पुन्हा एकदा आपण राजीनामा मागे घेणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक जेष्ठ नेत्यांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आता काँग्रेस अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नाच गाणे करणाऱ्या महिला वेश्याच असतात; खासदाराचे बेताल वक्तव्य

-‘मुंबई तुंबली आम्ही नाय पाहिली’; शिवसेनेच्या महापौरांचा अजब दावा

-झायरा वसीमचा निर्णय अन् अबू आझमी आणि शिवसेनेतच भांडणं…!

मोहन भागवत झाले डिजीटल; भागवतांनी केली ट्विटरवर एन्ट्री

-भारतीय संघाला धक्का; दुखापतीमुळे हा अष्टपैलू खेळाडू विश्वचषकातून बाहेर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More