मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केलेल्या लाठी-काठीच्या वादग्रस्त वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेते परेश रावल यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
गेल्या काही काळात काँग्रेस पक्षाचा आकार बराच वाढला आहे. अगदी महात्मा गांधींच्या दांडी मार्चपासून राहुल गांधींच्या लाठी मारेपर्यंत, असं ट्विट करत परेश रावल यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
परेश रावल यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मिती केली नाही तर सहा महिन्यात देशातले तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाठी-काठीने चोपतील, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.
Cong indeed has grown bigger in size over the years – from Mahatma Gandhi’s DANDI march to RG’s DANDA maar !!!
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 7, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
मला कुणाच्या परवानगीची गरज नाही; राष्ट्रीय वारकरी परिषदेला पवारांचं उत्तर
सीमालढ्यात बलिदान दिलेल्या शिवसैनिकांना शहिदाचा दर्जा द्या; एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
महत्वाच्या बातम्या-
“सरकार शेतकऱ्यांविरोधात गेल्यास राजदंडाचा वापर करू”
जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नका- अजित पवार
पुरोगामी पुण्यात गांधींचा कार्यक्रम रद्द ही लाजिरवाणी घटना; आव्हाड संतापले
Comments are closed.