बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दम लगा के हैशा! मेरोलिनच्या पुशअप्स चॅलेंजवर राहुल गांधींचा दस का दम, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | यंदाच्या वर्षी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा थरार रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींनी कन्याकुमारीमध्ये रोड शो केला त्यानंतर राहुल गांधींचा अलग अंदाज पाहायला मिळाला. कन्याकुमारीमध्ये राहुल गांधींनी युवा विद्यार्थी-विद्यार्थिंनीसोबत संवाद साधला. त्यावेळी राहुल गांधींना एका विद्यार्थीनीने पुशअप्स चॅलेंज दिलं.

राहूल गांधीनाही हे पुशअप्स चॅलेंज स्वीकारलं. व्यासपीठावर राहुल गांधींनी विद्यार्थीनीसोबत पुशअप्स मारायाल सुरूवात केली. यामध्ये राहुल गांधींनी 9 सेकंदात 13 पुशअप्स मारले.  पुशअप्स झाल्यावर विद्यार्थ्यांनी त्यांनी एका हातावर पुशअप्स  मारायला सांगितल्या. राहुल गांधींनी पुन्हा एकदा एका हाताने पुशअप करून दाखवले. राहुल गांधींचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे.

राहुल गांधींना ज्या विद्यार्थिनीने पुशअप्स चॅलेंज दिलं तिचं नाव मेरोलिन शेनिघा असं असून ती दहावीत शिकत आहे. राहुल गांधींचा फिटनेस चांगलं आहे हे यातून दिसून येत असल्याचं दिसून येतं. तर याआधी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी मच्छिमारांसोबत समुद्रात गेले होते. त्यावेळी त्यांनी समुद्रात उडी मारून मच्छिमारांसोबत पोहण्याचा आनंद घेतला. त्यानंतर त्यांचा एक फोटो सोशल माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला आणि त्याची चर्चाही पाहायला मिळाली. त्या फोटोमध्ये राहुल गांधींचे सिक्स पॅक एब्स दिसत होते.

दरम्यान, या  पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रकिया 27 मार्चपासून सुरू होणार आहेत. तर या पाचही निवडणुकीचे निकाल एकाच दिवशी म्हणजे 2 मे ला जाहीर होणार आहेत. यामध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुका सर्वात आकर्षक असणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील ‘या’ ठिकाणी गजा मारणेला वडापाव खाणं पडलं महागात; झाला गुन्हा दाख

‘पूजाच्या आई-वडिलांनी पाच कोटी घेतले’; शांता राठोडांच्या आरोपावर लहू चव्हाणांनी सोडलं मौन, म्हणाले..

‘जुनं ते सोनं’! इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी बैलगाडीतूनच केली नवरा-नवरीची पाठवणी!

संजय राठोडांनी आधीच राजीनामा दिला असता तर…- पंकजा मुंडे

धक्कादायक! अनैतिक संबंधात आणू शकतो अडथळा म्हणून केली पतीचीच हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More