नवी दिल्ली | पर्रिकरजी, तुमच्याबद्दल मला सहानुभूती आहे. तुमच्यावर पंतप्रधानांकडून किती दबाव असेल, हे मी समजू शकतो, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मनोहर पर्रिकरांच्या पत्राला उत्तर दिलं आहे.
राफेल करार बदलताना संरक्षण मंत्र्यांना काही विचारणा केली नव्हती, असं मला पर्रिकरांनीच कालच्या भेटीत सांगितलं, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
यावर पर्रिकरांनी पत्र लिहून 5 मिनिटांच्या भेटीत असली कोणतीही चर्चा झाली नाही म्हणत राहुल गांधींवर टीका केली होती.
पर्रिकरांनांवर दबाव आहे, त्यामुळेच त्यांना माझ्यावर टीका करावी लागत आहे. पंतप्रधानांवरील निष्ठा दाखवण्यासाठी त्यांना हे करावं लागत आहे, असं राहुल यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-टीव्ही प्रेमींसाठी महत्वाची बातमी, उद्यापासून तुमचा ‘टीव्ही’ होऊ शकतो बंद
-लोकसभा निवडणुकीत एनडीए बहुमतापासून दूर, युपीएची प्रगती- सर्वे
-‘ते आले आणि हजेरी लावून गेले’, भारताचा निम्मा संघ माघारी
-राज ठाकरे आघाडीत आल्यास फायदाच; छगन भुजबळांचे सकारात्मक संकेत
-जर काँग्रेसनं सन्मानानं उमेदवारी दिली तर पुण्यातून लोकसभा लढणार- संजय काकडे