Top News

“मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, माफी मागणार नाही”

नवी दिल्ली | भाजप सरकारला विरोध करत काँग्रेसने नवी दिल्लीत भारत बचाव आंदोनल सुरु केले आहे. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभेला संबोधित केले. मी काही राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

मी सत्य बोललो आहे. तरीही मला माफी मागायला सांगितली जात आहे. मी काही चुकीचं बोललो नाही. त्यामुळे मी घाबरणार नाही. माफी मागायला मी काही सावरकर नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी एका सभेत बोलताना भाजपने ‘मेक इन इंडिया’चं ‘रेप इन इंडिया’ केलं, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन लोकसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. राहुल यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी लावून धरली होती.

दरम्यान, काँग्रेसचं आज दिल्लीत ‘भारत बचाओ’ आंदोलन आहे. ढासळती अर्थव्यवस्था आणि इतर मुद्द्यांवर रामलीला मैदानावर देशभरातले काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांनी सभेला संबोधित केले.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या